कविता
अक्षरांच्या कपाऱ्यांत खूप काही
साचलेले सांगू पाहते कविता
म्हणूनच शब्दांना शब्द जोडून,
गरळ ओकत वाचू नये कविता
एकेक गाठ सोडवत भावनांची
उलगडू पाहते कविता
अलगद श्वासागणिक हळुवार
मोकळी करावी कविता
उलगडू पाहते कविता
अलगद श्वासागणिक हळुवार
मोकळी करावी कविता
उगा शब्दांची मुरड घालून
बांधू नये कविता
एकेक पाकळीने आपसूकच
फुलत जाते कविता
बांधू नये कविता
एकेक पाकळीने आपसूकच
फुलत जाते कविता
हळुवार अस्पष्ट भावनेपोटीच
जन्म घेते कविता
साऱ्यांच ओठांवर कदाचित म्हणूनच
रुळत नाही कविता
जन्म घेते कविता
साऱ्यांच ओठांवर कदाचित म्हणूनच
रुळत नाही कविता
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा