विरक्त
वाट मोकळी करून, मोक्ष - मुक्त होण्याची
कला अवगत झाली आहे आता.
त्या अगतिक क्षणी जेव्हा
धुसमुसून उत्कट, निर्लज्ज, अनावर
वासनांचे डोंब उसळून बाहेर पडतात,
तेव्हा ह्या साऱ्याचा अर्थ, अनर्थ उलगडताना
शरीर निपचित हेलकावे घेत राहतं
आणि मन तृप्ती- अतृप्तीच्या हिंदकळ्यांवर
झुलत राहतं,
धुसमुसून उत्कट, निर्लज्ज, अनावर
वासनांचे डोंब उसळून बाहेर पडतात,
तेव्हा ह्या साऱ्याचा अर्थ, अनर्थ उलगडताना
शरीर निपचित हेलकावे घेत राहतं
आणि मन तृप्ती- अतृप्तीच्या हिंदकळ्यांवर
झुलत राहतं,
तोच अस्पष्ट क्षण माझा...फक्त माझा.
जसा खोल डोहातून पार गुदमरून
डोके वर काढल्यावर
घेतलेल्या प्राणांतिक पहिल्या श्वासासारखा,
चूक- बरोबर,
सत्य-असत्य,
आरोप-प्रत्यारोप,
विश्वास-अविश्वास,
अगदी तुझे-माझे अस्तित्व ..
साऱ्या साऱ्याच्या पल्याड..
सगळ्यांतुन तुटून, तोडून दूर ध्रुवावर नेऊन ठेवणारा
तो एक क्षण
विरक्तीचा.
डोके वर काढल्यावर
घेतलेल्या प्राणांतिक पहिल्या श्वासासारखा,
चूक- बरोबर,
सत्य-असत्य,
आरोप-प्रत्यारोप,
विश्वास-अविश्वास,
अगदी तुझे-माझे अस्तित्व ..
साऱ्या साऱ्याच्या पल्याड..
सगळ्यांतुन तुटून, तोडून दूर ध्रुवावर नेऊन ठेवणारा
तो एक क्षण
विरक्तीचा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा