सोडुनिया गेला राया माझा
सोडुनिया गेला राया माझा
राहिल्या सावल्या आठवणी
दिसता प्रकाश डोळे पाणावती
काळोखाची कास प्रिय झाली
निजल्या निजल्या ना सुटती गणिते
चाचपता शून्य येई हाती
चालल्या मनाला शांत न उसंत
धावत्या जगाचा पाठलाग
ओले होती घाव पावलांचे
सारा मातीचाच होई देहही
दिशा वेडावल्या विचारती वाट
सूर्य शोधी साथ अंधाराची
बहिरेच शब्द, बहिरीच वाणी
कोरडया आरोळ्या रानीवनी
सोडुनिया गेला राया माझा
राहिल्या सावल्या आठवणी
राहिल्या सावल्या आठवणी
दिसता प्रकाश डोळे पाणावती
काळोखाची कास प्रिय झाली
निजल्या निजल्या ना सुटती गणिते
चाचपता शून्य येई हाती
चालल्या मनाला शांत न उसंत
धावत्या जगाचा पाठलाग
ओले होती घाव पावलांचे
सारा मातीचाच होई देहही
दिशा वेडावल्या विचारती वाट
सूर्य शोधी साथ अंधाराची
बहिरेच शब्द, बहिरीच वाणी
कोरडया आरोळ्या रानीवनी
सोडुनिया गेला राया माझा
राहिल्या सावल्या आठवणी
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा