जाणारे
उठून जाती कुणी आपुल्या
घरी
तेवत सायंकाळ जागत्या
उरी
अचानक मोती माळ सोडूनि
पडती
जीर्ण झाल्या पिवळ्या
पानांची गळती
बिलगे आठवणींचा पाचोळा
पायांभोवती
जुनीच चित्रे पळती डोळ्यांभवती
डोळ्यात ठेवुनी वात वाढती
वर्षे
स्मरणात राहुनी आत अखंड
जळती
किती राहती शब्द
आतच कोंडूनी
किती जिव्हारी टोचे मन अपराधी
जाणारे जाती न
कधीच परतण्यासाठी
सोडून नात्यांच्या अलगद रेशीमगाठी
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा