लाजव


परत पहाटे आज अचानक, रात जागवून गेला माधव
शहारले मन, थरारले तन, कशी थोपवू त्याचा आर्जव

श्वास चोरूनी श्वासांमधला, टिपून घेई तो माझेपण
नकळत सारून चंदेरी मन गळून पडले माझे लाजव

कळे न केव्हा रंग रंगला, ठसे उमलले नितळ तनूवर,
विरघळले हे सारे यौवन, निळ्यात हरले, सरले साजव

नभी उसळले सोनेरी क्षण, त्याला कुठली त्याची जाणीव
कवेत घुमते मार्दव-स्पंदन, स्वप्न मावळे, उगवे वास्तव

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट