खेकडा
कोपर्यात दडून बसला आहे
न जाणे कधीचा देवघराचा कोपरा
कुरतडत चघळत लपला आहे.
पितळी कृष्णाला ह्याची अजून चाहूलही नाही.
तो अजूनही हसत बघतोय माझ्याकडे.
पण वेड्या, तुला कल्पना नाही,
तुझ्या पायाखालची माझ्या विश्वासाची वीट
जर झिजली त्याच्या कुरतडण्याने,
तर तू पडायचास पार कोसळून खाली
मग उभा तरी कश्यावर राहशील?
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा