घन होऊ देत आज
घन होऊ देत आज, चिंब भिजवूनी गात्र
तुझ्या मनातले पात्र उतू जाऊ देत आज
घन होऊ देत आज...
तुझ्यातले अंतरंग, तुझा स्पर्श, तुझा गंध
सामावूनी ओंजळीत, उमलून ह्या नशेत
फुल होऊ देत आज,
घन होऊ देत आज...
स्वप्न डोळ्यात ठेवून, चांद उश्याशी घेऊन
मिट्ट काळोख्या नभात तुला घेउनी कुशीत
रात होऊ देत आज,
घन होऊ देत आज...
Beautiful!
उत्तर द्याहटवा