गीत माझे...
जरी नसे गीत माझे तुझ्या ओळखीचे
तरी कधी एक दिवस गुणगुणशील
अन ओळखून मनातल्या सुरांना
एक अनोळखी चाल बांधशील
ऐकशील एकटाच धुंद बेभान होऊन
कधी दरी कधी डोंगरमाथ्यावर फिरून
मग सांगशील तूच मला माझेच शब्द
पण अर्थ मात्र आता नवीन लावून
शोधशील मला त्या स्वरांच्या कोंदणात
अंगणात पडलेल्या शुभ्र चांदण्यात
असेन मी तिथेच तुझ्या मनात साठवून
आपुल्या गीतात सुरेल आयुष्य रंगवीत
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा