सांग ह्या मनाला



सांग ह्या मनाला पाहु नकोस आरश्यात
दिसतील अनंत तारे स्वप्निल हासण्यात
उमगेलही गुपित त्या शांत तारकांचे
अन् सांडतील स्वप्ने हळुवार ओंजळीत

मग एक पालवीने येईल वसंत साज
मग एक पावसाळी ही रात मंद धुंद
आणि सुटेल बान्ध गात्रातल्या नशेला
चिंबचींब भिजलेल्या उन्मादल्या कळ्यांना

कळेलही तुझे मन तुजला खुळ्या मना रे
पाहिलेस स्वप्न ते आभास भासणारे
मग उगीच छेडसी का तारा तनीमनी या
जागवून आशा निजल्या अंतरी या

ठेव हे गुपित पण जपून या उराशि
अन् घे शांत निज स्वप्नातल्या सुखाशी
कोण काय जाणे प्रतिबिंब काय सांगी
उगाच का मना रे तू आतआत रंगी

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट