ओल्या तारकांचे मन
ओल्या तारकांचे मन
हळव्या आसवांचे घन
स्वप्न रम्य पाहीलेल्या
हसऱ्या भावनांचे मन
आज शांत शांतलेल्या
अंतरंग न्हाहीलेल्या
कृष्णवेड्या यमुनेच्या
निजल्या चांदव्याचे मन
मंद मंद आर्तलेल्या
धुंद भान हरपलेल्या
गंध साज गुंफलेल्या
खुलत्या मोगऱ्याचे मन
संथ रात तेवणाऱ्या
गात्र गात्र मोहणाऱ्या
शब्द शब्द वेचणाऱ्या
मिटत्या पापण्यांचे मन
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा