गुंता


तू असताना किंवा नसताना, फरक फक्त एवढाच असतो,
तू असताना मी माझ्यात नसतो, तू नसताना मी तुझ्यात असतो

उरलंच  जर काही माझ्यात, चटकन डोळ्यांकाठी जमा होतं
एका आठवणीचा अवकाश आणि ते ही गळून रीतं होतं

मग शोध सुरु होतो परत स्वतःत स्वतःला शोधण्याचा,
उमगत काहीच नसतं हाती, पण नुसताच आनंद हरवण्याचा 

आणि उरला सारा वेळ मग जातो स्वतःला गोळा करण्यात,
इतस्थतः पसरलेल्या मला, तुझ्यातून हळुवार सोडवण्यात

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट