पाषाण
तू जरी असलास येथे, हा तुझा आभास आहे
ओळखीचा भासणारा चेहरा दुसराच आहे
वाहणाऱ्या आसवांचे अर्घ्य ओंजळीत आहे
भंगलेल्या ह्या मनाचे बिंब आरश्यात आहे
भंगलेल्या ह्या मनाचे बिंब आरश्यात आहे
हरवलेल्या चांदण्यांचा कवडसा हातात आहे
अन जिव्हारी लागणारा 'कोण तू?' हा प्रश्न आहे
अन जिव्हारी लागणारा 'कोण तू?' हा प्रश्न आहे
देवळाच्या पायथ्याशी शिंपिला मी प्राण आहे
पूजिला जो आर्ततेने कोरडा पाषाण आहे
पूजिला जो आर्ततेने कोरडा पाषाण आहे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा