जे तुझे माझ्यात होते


जे तुझे माझ्यात होते, ते कधी विरलेच नाही
एवढे माझ्यात उरले, मी मला कळलेच नाही 

वेगळे माझे असे 'पण' वेगळे उरलेच नाही
सोडल्या गाठी जरी तू, बंध हे सरलेच नाही 

कोरड्या-सुकल्या सुखाचे प्रेत मी पुरलेच नाही
तुंबले डोळ्यात पाणी अजूनही मुरलेच नाही  

झुंज ह्या वेड्या मनाची हारूनि हरलेच नाही
का तरी पण त्या मनाला मी कधी भरलेच नाही?

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय पोस्ट