निकडीच्या गोष्टी
काही गोष्टी खूप कठीण... पण निकडीच्या -
जसं चेहेऱ्यावर चेहरे लावायचे
रंगात रंग मिसळायचे
थोडेसेच बोलायचे
पण दातखिळी बसू द्यायची नाही
हसायचे,
कधी स्मित,
कधी मोठ्याने...
मग जांभई द्यायची,
आवंढे गिळायचे,
मुठी आवळ्याच्या,
कधी तुटलेली वाक्य नव्याने जोडायची
जुळलेले शब्द आपसूक मोडायचे
नजर चुकवायची
नजर फिरवायची
अगदी पार शून्यात पाहायचे
तिथे तरी कोरडा आडोसा मिळतो का ते बघायचे
पण डोळे मात्र सताड सुकेच ठेवायचे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा