कोलाज
इतके दूर जात राहिलो आपण?
इतक्या घट्ट विणीतून कसे सुटून
वेगळे होत गेलो आपण?
उन्हा पावसाच्या भांडणात,
इंद्रधनुष्य विखरत नसतं कधी,
मग का आपल्या रंगाचे वेगळे
कॅनव्हास रंगवायला लागलो आपण?
इंद्रधनुष्य विखरत नसतं कधी,
मग का आपल्या रंगाचे वेगळे
कॅनव्हास रंगवायला लागलो आपण?
त्या दिवसांच्या कितीतरी सावल्या
अजूनही अडखळतात पायात,
उगाच रेंगाळतात तिन्हीसांजेला
जाणून बुजून
अजूनही अडखळतात पायात,
उगाच रेंगाळतात तिन्हीसांजेला
जाणून बुजून
हसण्या-खिदळण्याच्या आवाजांची जळमटं
कितीदा जातीनं साफ केली मी
तरी लटकुनच राहतात वटवाघुळांसारखी
की दारातल्या शकुन तोरणांसारखी?
कितीदा जातीनं साफ केली मी
तरी लटकुनच राहतात वटवाघुळांसारखी
की दारातल्या शकुन तोरणांसारखी?
नेणिवेच्या तळावर दिसतात
तरंगताना दृश्य कित्येक
पण पकडण्याचा प्रयत्न केला कि
हाती नुसत्याच आरस्पानी आठवणी
तरंगताना दृश्य कित्येक
पण पकडण्याचा प्रयत्न केला कि
हाती नुसत्याच आरस्पानी आठवणी
दिवसेंदिवस वाढतच जाणाऱ्या अवकाशाची
हि पोकळी भरून तरी कशी काढावी?
कसा शिवायचा काळाचा पट
आपल्या व्यवहारी धाग्याने?
हि पोकळी भरून तरी कशी काढावी?
कसा शिवायचा काळाचा पट
आपल्या व्यवहारी धाग्याने?
म्हणून मीच कोलाज करून
त्या रंगांचा, सावल्यांचा आणि जळमटांचा
टांगून ठेवलाय भिंतीवर.
तेवढंच एक प्रदर्शन
आपल्या पुसत गेलेल्या मैत्रीचं
त्या रंगांचा, सावल्यांचा आणि जळमटांचा
टांगून ठेवलाय भिंतीवर.
तेवढंच एक प्रदर्शन
आपल्या पुसत गेलेल्या मैत्रीचं
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा