निर्णय
जेव्हा उभे असतो आपण काठावर,
स्तब्ध, पाय रोवून मनात,
आपल्याच चिंतनात.
तेव्हा विचारांच्या कित्येक लाटा
आदळत राहतात नेणिवेच्या पटलावर,
सरकवत मुळांतली माती योग्य- अयोग्यतेची.
आदळत राहतात नेणिवेच्या पटलावर,
सरकवत मुळांतली माती योग्य- अयोग्यतेची.
अनिश्चिततेचं पाणी रुजू देत नाही काहीच,
नेतं वाहवून थोडं मुठभर जमलेलं पाठबळही.
कुजबुजत राहते नकाराची किणकिण कानभर
आणि आत आत ओढू पाहतात मागे
आपलेच आपल्यावरच्या अविश्वासाचे धागे.
नेतं वाहवून थोडं मुठभर जमलेलं पाठबळही.
कुजबुजत राहते नकाराची किणकिण कानभर
आणि आत आत ओढू पाहतात मागे
आपलेच आपल्यावरच्या अविश्वासाचे धागे.
असं असताना सारं,
कोण जाणे कुठून आत खोलवर
धुगधुगत असते एक अजाण उर्मीही,
काय असावं पलीकडे हे पाहण्याची,
धुक्यातून वाट चाचपडण्याची,
क्षितिजाचं माप ओलांडण्याची.
कोण जाणे कुठून आत खोलवर
धुगधुगत असते एक अजाण उर्मीही,
काय असावं पलीकडे हे पाहण्याची,
धुक्यातून वाट चाचपडण्याची,
क्षितिजाचं माप ओलांडण्याची.
जाणवते धडपड पोटात उडणाऱ्या फुलपाखरांची
धगधगत्या जाणिवेच्या ऊबेला येऊन बसण्याची,
तेव्हा हळूहळू हाती लागतो आपणच आपल्याला,
मिट्ट काळोखात गोळा करत आत आतला प्रकाश.
धगधगत्या जाणिवेच्या ऊबेला येऊन बसण्याची,
तेव्हा हळूहळू हाती लागतो आपणच आपल्याला,
मिट्ट काळोखात गोळा करत आत आतला प्रकाश.
आणि मग कुठूनसा परतून घोंघावत येतो,
घट्ट बिलगतो मनाला वाट चुकलेला आत्मविश्वास,
देऊन जातो कानमंत्र शाश्वतीचा,
पाठीशी उभा राहून कुरुक्षेत्रातल्या कृष्णासारखा.
घट्ट बिलगतो मनाला वाट चुकलेला आत्मविश्वास,
देऊन जातो कानमंत्र शाश्वतीचा,
पाठीशी उभा राहून कुरुक्षेत्रातल्या कृष्णासारखा.
तिथेच त्या बिंदुपाशी, त्याच क्षणाला,
डोळे मिटुन व्रतस्थ ऋषिसमान,
मन घेतं बुडवून एक खोलवर श्वास अंतर्मनात
आणि वाहतं अर्घ्य त्या नुकत्याच जन्मल्या निर्णयाला.
डोळे मिटुन व्रतस्थ ऋषिसमान,
मन घेतं बुडवून एक खोलवर श्वास अंतर्मनात
आणि वाहतं अर्घ्य त्या नुकत्याच जन्मल्या निर्णयाला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा