डोह
बरसत्या सरीखाली मन आडोश्याला उभे
ओले वारे, ओले तारे, चिंब श्वासांचे हिंदोळे,
बहरल्या मनासंगे अंगी हिरवळ चळे
बहरल्या मनासंगे अंगी हिरवळ चळे
वास मातीच्या फुलांचा, चहूकडे दरवळे,
मनातल्याही कुपीची दारं अलगद खुले
मनातल्याही कुपीची दारं अलगद खुले
किती भिजल्या क्षणांचे डोह मनात साचले,
हितगुज ऐकायाला आज धुके उतरले
हितगुज ऐकायाला आज धुके उतरले
किती तुझे किती माझे आज ढगांनी ओतले,
भरभरून डोळ्यांना पुन्हा नव्याने भेटले
भरभरून डोळ्यांना पुन्हा नव्याने भेटले
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा