काठाशी ह्या तळ्याच्या
किती घट्ट गर्द झाडीत,
किती घट्ट धुक्याच्या दुलईत,
किती स्तब्ध डोंगर पायथ्याशी,
पुंजक्यांनी राहिल्या आहेत,
कित्येक कविता.
एक टीपावी हलकेच तर
साऱ्याच झुळझुळन बाहेर याव्यात.
मग उडून पानफुलांवर बसतात काही,
काही सरकतात तळ्याच्या पाण्यात,
काही हळुवार अस्पष्ट धुक्यात,
तर काही वाहत जातात हवेवर.
एखादी येते हळूच उडून मग
बसत मनाच्या एकांतात,
उबेने पंख फुटतात तिला
आणि परकी होते क्षणात.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा