तू चांदणे होशील का?
आसमंती धुंद न्हाले चित्र तू होशील का?
काळरात्रीच्या मनाला काजवे होशील का?
राहिलेले रंग काही आज तू भरशील ना?
चंद्र आहे ह्या नभाला, चांदणे होशील का?
ओंजळी वेचून माझे शब्द तू घेशील का?
सांडलेले गीत माझे उचलूनी घेशील का?
दरवळे निशिगंध त्यांचा, श्वास तू घेशील ना?
चंद्र आहे ह्या नभाला, चांदणे होशील का?
रंगल्या ओल्या पिसांचे पंख तू देशील का?
सातरंगी वाट उमटे, साथ तू देशील का?
पण कधी राहीन मागे, साद तू देशील ना?
चंद्र आहे ह्या नभाला, चांदणे होशील का?
श्रावणाच्या द्वाड खेळी डाव तू घेशील का?
ऊन-पावसाच्या वेळी मेघ तू होशील का?
बरसून मन शांत झाले, तू पुन्हा भरशील ना?
चंद्र आहे ह्या नभाला, चांदणे होशील का?
छान..
उत्तर द्याहटवा