साशंक
गारवा झोंबतो मनाला,
सांगे नको त्या कहाण्या
उगाच ग्रासते मळभ
शिशिरातल्या उन्हाला
सांगे नको त्या कहाण्या
उगाच ग्रासते मळभ
शिशिरातल्या उन्हाला
जे ऐकलेच नुसते
सारेच सत्य भासे
आणि खरेखुरे ते
मग धुक्यामध्ये लपावे
सारेच सत्य भासे
आणि खरेखुरे ते
मग धुक्यामध्ये लपावे
वाहती नद्या अफाट,
प्रश्नांस पूर येई
कोऱ्याच कागदाची
त्यात साशंक नाव वाही
प्रश्नांस पूर येई
कोऱ्याच कागदाची
त्यात साशंक नाव वाही
नव्हते कधीच जे ते
मग चित्र रंगवावे
कुंचल्यास निकड कसली
पाणीच रंग व्हावे
मग चित्र रंगवावे
कुंचल्यास निकड कसली
पाणीच रंग व्हावे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा