अंतर
तुझ्या शहराचे आणि माझ्या शहराचे
तसे काहीच सख्य नाही
पण तिथून येणाऱ्या वाऱ्यावर
माझ्या वेलींची फुले बहरतात
हे मात्र खरं!
तसे काहीच सख्य नाही
पण तिथून येणाऱ्या वाऱ्यावर
माझ्या वेलींची फुले बहरतात
हे मात्र खरं!
कधी पडलाच इथे पाऊस तर
तुझाही ऊर ओला होतो
अन् वादळात तुझ्या
इथे माझ्या सागराला पूर येतो
तुझाही ऊर ओला होतो
अन् वादळात तुझ्या
इथे माझ्या सागराला पूर येतो
तिथल्या आभाळाला कसं कळतं
माझ्या डोईवरचं ऊन?
अलगद सावळ्या मेघांची चादर
जाईन तिथे ओढून जातं
माझ्या डोईवरचं ऊन?
अलगद सावळ्या मेघांची चादर
जाईन तिथे ओढून जातं
आठवतो तो मोगरा
तू जाताना आपण रोवून गेलो होतो?
त्याला कधी माझी माती कळलीच नाही
अजूनही तो परिजाताची फुलं देतो ...
तू जाताना आपण रोवून गेलो होतो?
त्याला कधी माझी माती कळलीच नाही
अजूनही तो परिजाताची फुलं देतो ...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा