हे घर मंतरलेले
हाक ऐकू येत आहे मागल्या दिसांची
पाठून धावणाऱ्या अबोल सावल्यांची
पाहू नकोस वळूनी त्या लाघवी क्षणांना
करतील पाठलाग हळूच पावलांचा
पाठून धावणाऱ्या अबोल सावल्यांची
पाहू नकोस वळूनी त्या लाघवी क्षणांना
करतील पाठलाग हळूच पावलांचा
खिडकीतूनी कशाला कुणीतरी पहाते
दिवे मालवूनी ही काळरात्र येते
उघडेच ठेव डोळे, घर सांगते कहाणी
भिंतीवरी समोरी हे सावल्यांचे खेळे
दिवे मालवूनी ही काळरात्र येते
उघडेच ठेव डोळे, घर सांगते कहाणी
भिंतीवरी समोरी हे सावल्यांचे खेळे
नव्हे चार भिंती, हे चक्रव्यूह आहे
अंधारल्या जगाचे हे गूढ विश्व सारे
उंबऱ्या पलीकडे त्या काळाचे अंतर गेले
अजुन पहाते वाट तुझी हे घर मंतरलेले
अंधारल्या जगाचे हे गूढ विश्व सारे
उंबऱ्या पलीकडे त्या काळाचे अंतर गेले
अजुन पहाते वाट तुझी हे घर मंतरलेले
कुणीतरी उश्याशी बसून श्वास घेई
स्वप्नात पाहिले ते वास्तवात येई
टाक पावले जपुन, ये सावकाश आत
स्वप्नात पाहिले ते वास्तवात येई
टाक पावले जपुन, ये सावकाश आत
परतण्यास पुन्हा नसे कोणताच मार्ग
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा