रखुमाई
कधीची रे उभी आहे तुझ्यापासून वेगळी
तुझा सारा वेळ तरी भक्त-भाबड्यांच्यासाठी
पुंडलिकाचीच सारी तुझ्या जीवाला काळजी
रागावून जरी उभी, दोन हात कटेवरी
रागावून जरी उभी, दोन हात कटेवरी
किती सांगते मी रोज चंद्रभागेला चहाडी
तिच्या पाण्यातुन तरी तुझ्या नावाचीच गोडी
तिच्या पाण्यातुन तरी तुझ्या नावाचीच गोडी
कसा भुललासी मला, आहे द्वारकेची राणी
इथे मी एकटी, तिथे खुळ्या सात जणी
इथे मी एकटी, तिथे खुळ्या सात जणी
इथे दिस-सायंकाळी माझी एकटी आरती
मंदिरात साऱ्या तुझ्या दिसे राधेसंग जोडी
मंदिरात साऱ्या तुझ्या दिसे राधेसंग जोडी
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा