परत निघून जाताना


परत निघून जाताना
जरा सावकाश जा
बऱ्याच भिंती पडतात
माझ्या घराच्या

घट्ट लावलेली तावदानं
सताड उघडी करतात
सततचे हेवेदावे
आपल्यातले दुरावे

ह्यावेळी निघून जाताना
कौलांचे वासे माझ्या
खळकन निसटून
पडले आहेत अंगणात

छपरांतलं पाणी ओघळून
डोळ्यात साठतय
मनात तरंगतंय
नितळ तुझं प्रतबिंब

जसा गेलास तसाच
परतून येशीलही क्षणात
तक्रार करत
विझलेल्या दिव्यांची,
फुटक्या छताची,
मोडक्या खिडक्यांची
आणि सुटलेल्या झुंबरांची

तु परत येईस्तोवर आता
बरीच कामं आहेत अजून
मनाची डागडुजी
घराची तयारी

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट