जय सिध्दीदा जय तुंदला


जय सिध्दीदा जय तुंदला जय भक्तविघ्नविनाशया
जय अग्रया-अनिकासुता जय सर्वकार्य-प्रदायका
चरणी तुझ्या वसती सदा विज्ञान-बुद्धीमनीषिता
तुज दर्शनी हरिती व्यथा, जाती विरुनी सर्वदा

अनिरुद्ध तू स्थितप्रेमना, स्थितधीपती सुखसागरा
तूच पालसि सुधीराधरा, धरसी मही लंबोदरा
तूच ऐकसी राजेश्वरा, हि स्पंदने ह्या यातना
तुज दर्शनी तरती जीवा, हे सदय सिद्धिविनायका

भू-सलील-तेजस् ह्या नभा, तू तारीशी सर्वात्मका
तव लोचनी सविता-सुमा, समीरात व्यापक माहता
नवनित्य नितीन तुझी प्रभा, पसरे सदा दाही दिशा,
तुज दर्शनी झुरतो सदा, मी सुधित मंगेशात्मजा

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट