रेशीम धागे
ओघळले रेशीम धागे, मेघांच्या सुटल्या गाठी
पानांनी अलगद गुंफून, पांघरल्या हिरव्या शाली
वाऱ्याने अल्लड धावून मारली अचानक मिठी
मोहरली पाने पाने सांडूनि दवांचे मोती
मोहरली पाने पाने सांडूनि दवांचे मोती
मृदगंधाचे अत्तर लावून, पक्ष्यांची माळून वेणी
साचल्या दर्पणी झाडे शृंगार साजरा करती
साचल्या दर्पणी झाडे शृंगार साजरा करती
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा