कितीदा
मी कैक चांदण्या न्हालो, कित्येक आसवे प्यालो
लाटांच्या फेसाळावर पण कितीदा परतुनी आलो
रानात अडकला जीव, फांद्यात गुंतला होता
खुडताना पानांमधुनी, त्याला वास फुलांचा येतो
खुडताना पानांमधुनी, त्याला वास फुलांचा येतो
वाळूत रुतवुनी बोटे तो चंद्र थांबला होता
केसांत कुणाच्या अजुनी का रात जागवीत होतो?
केसांत कुणाच्या अजुनी का रात जागवीत होतो?
ते आकाशाचे देणे, मी आकाशाचा झालो
ऋण कुठल्या त्या जन्मीचे, मी व्याज मोजुनि झिजलो
ऋण कुठल्या त्या जन्मीचे, मी व्याज मोजुनि झिजलो
ह्या रानफुलांच्या वाटा मी कितीदा तुडवीत गेलो
उगाच चकवा म्हणुनी मी कितीदा हरवत गेलो
उगाच चकवा म्हणुनी मी कितीदा हरवत गेलो
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा