आठवण
उनाड वाऱ्यासंगे वेडे दूरदूर भिरभिरते
तुझी आठवण येते अन् मन मोरपिसासे होते
वेढून गर्द निळाई अंगी आतआत मोहरते
वेढून गर्द निळाई अंगी आतआत मोहरते
तुझी आठवण येते अन् मन सांज कोवळे होते
क्षितिजाच्या काठावर बसुनी स्वप्न रात रंगवते
क्षितिजाच्या काठावर बसुनी स्वप्न रात रंगवते
तुझी आठवण येते अन् मन गाढ सावली होते
नको नको त्या शंकांच्या पावलांत घुटमळते
नको नको त्या शंकांच्या पावलांत घुटमळते
तुझी आठवण येते मग मन कासाविससे होते
तुला पाहण्यासाठी आतुर किती जिव्हारी झुरते
तुला पाहण्यासाठी आतुर किती जिव्हारी झुरते
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा