आजकाल


आजकाल सगळेच अनोळखी वाटतात
कितीही आपले असले तरी
अर्ध्या चेहेऱ्याने परकेच वाटतात
डोळ्यांना ओळख पटतेही कधी
पण आतला तो तोच आहे का अजून?
की तो ही बदलवेल आपल्याला आतून?
असे प्रश्न भांबावत राहतात.
मग अंतराचे नियम पाळून,
न दिसणारे हसू दाखवत,
काहीही न बोलता,
जातो निघून आपण लांबूनच,
आणि तो बघतच राहतो 
बदललेल्या आपल्याकडे

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट