देखियेले रूप
उरला प्रपंच तुझ्या चरणाशी
ओढोनि घेतले माझ्यातून माझे
राहिले न काही माझ्याठायी
राहिले न काही माझ्याठायी
झाकता नयन दिसे तुझे मुख
झालासी एकोपा आंतर्बाही
झालासी एकोपा आंतर्बाही
इतुकी अफाट पसरली कांती
दिसे नाही काही अन्यत्वयी
दिसे नाही काही अन्यत्वयी
बघता बघता विठू गगनाशी
पसरली मूर्ती दाही दिशी
पसरली मूर्ती दाही दिशी
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा