पुन्हा


पुन्हा हे बरसणे तुझे आर्ततेचे,
नव्याने पुन्हा तेच ओलावणे,
पुन्हा हे भुलवणे तुझे श्रावणाचे,
पुन्हा ह्या मनाचे ऋतू थांबणे

पुन्हा ते विसरणे किती काय गेले,
तुझे ते उन्हाचे पुन्हा चांदणे
पुन्हा हे बिलगणे तुझे ह्या तनुला, 
तुझा स्पर्श ओला, सुका जाणवे

पुन्हा हे थबकणे तुझे पावलांशी, 
तुझे ते पुन्हा परतुनी पाहणे,
पुन्हा हे तुझे खेळणे ह्या मनाशी, 
नव्याने तुझे हारूनि जिंकणे

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट