इतक्यातच
कोलमडून पडलं आहे विश्वासाचं झाड,
अजून त्याच्या दुःखट हिरवट पानांची
छटाही सुकली नाही...
त्याच्यात जीव रूतवून बेमालूम वाढणाऱ्य
ा असंख्य अपेक्षांच्या रानवेलींनीही
अजून आपले रुतवलेले पंजे
सोडले नाहीत त्यातून,
आणि तरीही...
टाकून, झिडकारून सारे अंत्यविधी,
मन मात्र विवस्त्र होऊन
धाव घेत आहे नदीपल्ल्याड,
त्या अजाण, अनोळखी
उभ्या असलेल्या एकल वटवृक्षाकडे..
त्याच्या अजस्र पसरत जाणार्या,
आभाळ उचलून धरणाऱ्या फांद्यांकडे...
त्याच्या आश्वस्त करणाऱ्या चिरंतन छायेकडे...
राहील हा तटस्थ तो?
की तोही कोलमडेल तसाच
सारं काही उधळून,
उकरून माझी मुळं?
टाकून, झिडकारून सारे अंत्यविधी,
मन मात्र विवस्त्र होऊन
धाव घेत आहे नदीपल्ल्याड,
त्या अजाण, अनोळखी
उभ्या असलेल्या एकल वटवृक्षाकडे..
त्याच्या अजस्र पसरत जाणार्या,
आभाळ उचलून धरणाऱ्या फांद्यांकडे...
त्याच्या आश्वस्त करणाऱ्या चिरंतन छायेकडे...
राहील हा तटस्थ तो?
की तोही कोलमडेल तसाच
सारं काही उधळून,
उकरून माझी मुळं?
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा