मुख्य सामग्रीवर वगळा
Search
हा ब्लॉग शोधा
शब्दमात्र
पेज
Home
आणखी…
शेअर करा
लिंक मिळवा
Facebook
X
Pinterest
ईमेल
अन्य अॅप्स
जून १५, २०२१
मोहोर
इथे ह्या नभाचे असे स्पर्श ओले,
की माझ्या ऊरी बरसते चांदणे
नव्याने पुन्हा यौवनी-कात ल्यावी,
अशी बासरी आज गुंजाळते
किति शब्द वेडे अनायास होते
परी अर्थ त्यांचा कुशी दरवळे
अशी रातराणी खुले ह्या निशेला,
ओंजळी ओंजळी श्वास गंधाळते
कितीही पुरावे मनाने पुसावे,
तरी आठवूनी तनु मोहरे
नसे तू जरी हात हातात द्याया
तुझे नाव ओठांत हुंकारते
टिप्पण्या
लोकप्रिय पोस्ट
जानेवारी ०९, २०२३
अविरत
ऑगस्ट ११, २०२५
विरक्त
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा