अविरत


अविरत असा
माझ्या डोळ्यांत गवसता गवसता
चट्कन गळून जाताना,
किंवा तुझ्या धूसर आठवणींतून,
पुसट विरत जाताना,
कधी सावल्यांच्या खुणांत,
तर कधी आत आत उरात,
स्पर्शास्पर्शातून वाहताना,
आणि दुरून नुसतंच न्याहाळतानाही,
अगदी श्वासातून श्वास
घेण्याजोग्या अंतरावरूनही
चालूच राहतो
हा शोध
माझ्यातून तुझा
आणि तुझ्यातून माझा

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट