उच्छाद
अचानक उरावर थाप देते कविता
आत शिरून, बिनधास्त थपकल मारून,
कसलेच आढेवेढे न घेता,
घुसळत राहते कविता,
निष्पाप अल्लड मुलीसारखी,
सैरावैरा धावत, विचारांची झापडं
उघडत, आपटत, उच्छाद मांडते कविता,
आणि शब्दांची आवराआवर,
भावनांची सावरासावर करेपर्यंत,
पाठल्या दाराने पसारही होते कविता
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा