मुख्य सामग्रीवर वगळा
Search
हा ब्लॉग शोधा
शब्दमात्र
पेज
Home
आणखी…
शेअर करा
लिंक मिळवा
Facebook
X
Pinterest
ईमेल
अन्य अॅप्स
ऑक्टोबर ०२, २०२३
मावळतीवर पैलतीरावर
बिंब निरवते अस्तचलावर,
रंग मिसळुनी जल, गगनावर
संथ होती हे गात्र पिसांचे
निपचित बसुनी गर्द तरुंवर
कृष्ण-कोवळी माया अलगद
पसरत जाते सांज धरेवर
नकळत फुलती चंद्र-चांदणे
अंधुक निळतम या पटलावर
असेच आपण भेटू परतून
मावळतीवर पैलतीरावर
टिप्पण्या
लोकप्रिय पोस्ट
ऑक्टोबर २२, २०२३
रेशीमगाठी
जानेवारी ०९, २०२३
अविरत
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा