गुलमोहर
चकार शब्द न काढता गंधाळावं,
डोळ्यांनीच भरभरून बोलावं,
कधीतरी रखरखत्या उन्हातला गुलमोहर व्हावं
वेल्हाळ मन थोडं जरा गोंजारावं
आरश्यात पुन्हा पुन्हा स्वतःलाच पहावं
बेभान वेंधळ्या स्वप्नांत भिजावं, बुडावं
कधीतरी रखरखत्या उन्हातला गुलमोहर व्हावं
आरश्यात पुन्हा पुन्हा स्वतःलाच पहावं
बेभान वेंधळ्या स्वप्नांत भिजावं, बुडावं
कधीतरी रखरखत्या उन्हातला गुलमोहर व्हावं
आजूबाजूचं सारं काही आहे ते निरवावं,
मनाच्या भिंती सारवून नवीन मन बिंबावं
आतून सजावं, स्वतःतच रुजून फुलून यावं
कधीतरी रखरखत्या उन्हातला गुलमोहर व्हावं
मनाच्या भिंती सारवून नवीन मन बिंबावं
आतून सजावं, स्वतःतच रुजून फुलून यावं
कधीतरी रखरखत्या उन्हातला गुलमोहर व्हावं
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा