आंतरझरा


उगा असंच कधीतरी बहरून यावं,
निरभ्र काळोखाचं पांघरूण हळुवार बाजूला सारून,
जशी सोनेरी करत जाते पहाट माया, काया...
तशीच काहीशी संथ, शांत झुळूक घेऊन येते
सुखाची चाहूल.
फुलांच्या गर्भाशी थेंब थेंब साठत जावा मध
तसे मन भरत जाते क्षणाक्षणाने...
पाणावल्या डोळ्यांनी दीसू लागतात धूसर स्वप्नं,
तरंगत राहते हसू ओठांच्या कानोल्यांत,
आणि मग आत आत अंतर्मुख होत मन,
वाहू लागते फुल कृतज्ञतेचे
दुधडी भरून वाहू लागलेल्या
आंतरझऱ्यापाशी.

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट