मदत


आपल्यापुढे दुसऱ्याने पसरलेले हात
आणि आपण दुसऱ्यापुढे पसरलेले हात
ह्या दोहोंतील फरक किती सूक्ष्म
पण तेवढाच दाहक.
रेषेपलीकडे कधी आपण, तर कधी दुसरा.
उन्हात कधी तो, तर सावलीत कधी आपण.
कदाचित म्हणूनच
ह्या साऱ्या भिक्षा-दानाच्या खेळात जेव्हा
राज्य दुसऱ्यावर येतं,
तेव्हा लपताना, दूर पळताना
मागून येणारा मदतीसाठीचा आवाज
किती ओळखीचा वाटतो आपल्याला

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट