काहीसे अबोल....

काहीसे अबोल अपुले नाते,
मनातले, ओघळणार्‍या दवातले....

कधी हलक्याश्या पिसासवे,
उडण्याची आस घेउन तरंगणारे हवेतले....
तसेच काहीसे...

कधी खुलणार्‍या फुलातले,
साखरझोपेतून जागलेल्या स्वप्नातले...
तसेच काहीसे...

काहीसे नवे, काहीसे खोल डोहातले,
कागदी बोटीच्या प्रवासातले...
तसेच काहीसे...


काहीसे अबोल अपुले नाते,
मनातले, ओघळणार्‍या दवातले....


टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट