सांग रे मना


सांग रे मना सांग, कोण मी? 
दिसेन मी क्षितिजावारी, दिसे न शांत स्तब्ध मी
धग्ध मी, ज्वलंत मी, नव्हे रवि तरी,
सांग रे मना ... कोण मी?


व्यक्त मी घनिवनि, अव्यक्तहीन स्पर्श मी,
चराचरि सजीव मी, नव्हे पवन तरी,
सांग रे मना... कोण मी?


सुशील मी, प्रवाह मी, संजीवनी अमूल्य मी,
अनिल, नेत्र यांत मी, नव्हे नीर् तरी,
सांग रे मना .. कोण मी?


कधी इथे, कधी तिथे, अर्थ, स्पर्श अन् वेदनी,
धावतो तुझ्यात मी, स्वप्न, आस, आठवणीतुनी


तूच होत आरूढी, होऊन कृष्णसारथी,
दाखवी रणांगणे, कधी रम्य ती सरोवरे 


अनंत रे तुझ्या दिशा, असंख्य रंगभूमिका,
तर्कहिन भूप तू, उन्मत्त वेग अश्व तू,


मग कसा सांग आवरू? कसा तुला सावरू?
अबल मी, असमर्थ मी, अस्तित्वहीन निमित्त मी,
तुला थोपविन असा... सांग रे मना कोण मी? 

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट