आठवणींचे ओले पान..
आठवणींचे ओले पान नकळत अलगद गळले
त्या पानाच्या हिंदोळ्यावर मन मग आतच झुरले...
क्षण क्षण मागे पाउल टाकीत त्याच बिंदुशी स्थिरला
जिथुनी एक नवीन संवाद मनमनाशी भिडला
दोन जीवांचा अटूत धागा बंध घालूनी गेला
अन् त्या बंधाच्या गाठी मग अनमित उरूनी गेल्या
सांग तूच मग डाव कुणाचा खेळ खेळता हुकला?
कोण मांडून सर्व पसारा आतआत चुकचुकला?
किती गवसले काय हरवले हिशेब चुकले सारे
सांग मला तू ह्या सार्याचे गणित कुणी मांडावे?
अजुन कधीही बांध मनाचा अलगद सुटून जातो
त्या बांधाच्या काठावरती क्षणिक श्वास विसावतो
जे गेले ते अद्भुत होते तो विरक्त मनाला सांगे
अश्रूंचे मग अर्घ्य वाहुनी तोही स्थिरसा चाले
होते सारे अबोल तरीही निर्जीव नव्हते ना रे?
होते सारे उमगत तरीही थोपविता ना आले
आज अचानक ओले पान ते पावलात अडखळले
त्या स्पर्शाने मन मग वेडे चिंबचींब थरथरले

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा