सांगण्यासारखं बरंच काही

तुला सांगण्यासारखं बरंच काही असतं, पण ...
शब्दांना नजरेची भाषा शिकवायची म्हणेच जरा कठीणच असतं...
शब्दांना जमतो पाठशिवणीचा खेळ,
एकात एक गुंतलेल्या साखळ्यांची वेल
कितीही बाहेर पडले तरी ते काहीसे अपुरेच वाटतात
आणि मनातल्या भावना मनातच साचून राहतात
नजरेचं मात्र तसं नाही, तिला अबोल्याचा शाप जरी
थोडा वेळ का होईना गाठ पडली तरी सारं सांगून होते रिती
शब्दांना असते अर्थाची झालर, आर्त कानांची गरज
नजरेला मात्र हवी नुसती अजून एक भिडलेली नजर
शब्दांना थोडच जमणार आहे ओलं चिंब होऊन तुझी वाट बघणं?
नाहीच जमणार त्यांना तु दिसताच पापण्यांच्या आडोश्याला टेकणं
त्यांनी तुला साद घालेपर्यंत नजरेचा आधीच डाव साधलेला असतो
आणि तुझ्या नजरेने माझ्या मनाचा कधीचाच ठाव घेतलेला असतो
हे सारं शब्दांना समजावणं फार कठीण
त्यांच्या व्याकरणात हे बसणारही नाही
म्हणून तुला सांगण्यासारखं जरी बरंच काही असलं
तरी ते कळायला आता तरी तुझ्या नजरेने शिकायला हवं

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट