किती दिसांनी
आज बरसला किती दिसांनी
आला अवचित माझ्या दारी
मला म्हणाला बस शेजारी
सांगायाचे बरेच काही
आला अवचित माझ्या दारी
मला म्हणाला बस शेजारी
सांगायाचे बरेच काही
रडला नुसता, बोलत नाही
मला न समजे, उमगे काही
टिपे गाळली माझ्या मातीवर
भिजले मन, मोहरली पाती
मला न समजे, उमगे काही
टिपे गाळली माझ्या मातीवर
भिजले मन, मोहरली पाती
म्हणे मला तुज आठवतो का
दिवस जसा गेल्या जन्मीचा?
दिल्या घेतल्या आणा-भाका,
थोडे अश्रू, काही शपथा
दिवस जसा गेल्या जन्मीचा?
दिल्या घेतल्या आणा-भाका,
थोडे अश्रू, काही शपथा
कधी न कळले कसा कधी पण
बदलत गेलो श्रावण-आषाढा
कधी न तेव्हा अर्थ लागला
अद्भुत ह्या आपुल्या नात्याचा
बदलत गेलो श्रावण-आषाढा
कधी न तेव्हा अर्थ लागला
अद्भुत ह्या आपुल्या नात्याचा
निघून गेलो दूर देशी मग
वाऱ्याच्या अश्वांवर आरूढ
मागे सरले, पडले मागे
ऋतू आपुले इंद्रधनुचे
वाऱ्याच्या अश्वांवर आरूढ
मागे सरले, पडले मागे
ऋतू आपुले इंद्रधनुचे
कधीचे सारे भरून होता
सारे ओतून बरसत उरला
मला म्हणाला सांग तुझे मन
मी ही उघडले प्रश्नांचे दालन
सारे ओतून बरसत उरला
मला म्हणाला सांग तुझे मन
मी ही उघडले प्रश्नांचे दालन
सांग कसा तुज आज गवसला
ठेवा आपुल्या आठवणींचा?
मृगजळ माझ्या डोळ्यांभोवती
नाच कोरड्या पाचोळ्यांचा
ठेवा आपुल्या आठवणींचा?
मृगजळ माझ्या डोळ्यांभोवती
नाच कोरड्या पाचोळ्यांचा
किती जमवले, किती टिकवले,
रूप तुझे ते माझ्यामध्ये
मी माझेपण उरले नाही
बाष्प होऊनि उडून गेले
रूप तुझे ते माझ्यामध्ये
मी माझेपण उरले नाही
बाष्प होऊनि उडून गेले
गदगदलेल्या जीर्ण मनाने
चिडला तो क्षणभर कृष्ण घनांनी
वीज चमकली नजरी त्याच्या
करी याचना अंबर-धारांनी
चिडला तो क्षणभर कृष्ण घनांनी
वीज चमकली नजरी त्याच्या
करी याचना अंबर-धारांनी
त्याचे ते वेडे अल्लड-बालिशपण
बघून भरले माझे रितेपण
बांध फोडुनी मनात माझ्या
उधाण घालती सरिता सागर
बघून भरले माझे रितेपण
बांध फोडुनी मनात माझ्या
उधाण घालती सरिता सागर
ओल्या साऱ्या आठवणींचा
सडा पसरला मनात माझ्या
मृदगंधाने फुलून गेल्या
कळ्या कोवळ्या प्राजक्ताच्या
सडा पसरला मनात माझ्या
मृदगंधाने फुलून गेल्या
कळ्या कोवळ्या प्राजक्ताच्या
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा