सांजपक्षी
थकलेले सांजपक्षी
परतीच्या आकाशी
सूर्यबिंब घेऊनी हाती
दिवस निघे घराशी
परतीच्या आकाशी
सूर्यबिंब घेऊनी हाती
दिवस निघे घराशी
डोळ्यांच्या उंबरठयावर
उभी दिसे आस पिलांची
काही झरझरते क्षण अन्
हुरहूर परत उद्याची
उभी दिसे आस पिलांची
काही झरझरते क्षण अन्
हुरहूर परत उद्याची
पेंगुळले डोळे तरीही
धडपड क्षण धरण्याची
थोडे तास, थोडे श्वास,
काही घास सायंकाळी
धडपड क्षण धरण्याची
थोडे तास, थोडे श्वास,
काही घास सायंकाळी
वाटे पळभर घट्ट धरावी
कुशीत सांज सुखाची
पण घटका पळताना पुढली
येई रात उशाशी
कुशीत सांज सुखाची
पण घटका पळताना पुढली
येई रात उशाशी
सरला आज पण उद्या परत तो
उभा राहतो दारी
इवल्याश्या अनमोल क्षणांचे
मन मग परत भिकारी
उभा राहतो दारी
इवल्याश्या अनमोल क्षणांचे
मन मग परत भिकारी
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा