वारुळ


आपलं नातं- मुंग्यांचं वारुळ.
आतल्या मुंग्या कधीच्याच घर सोडुन गेल्यात,
राहीले आहेत पोकळ वासे
आणि मोठी भगदाडं भिंतींना.
त्यातून उन्हाच्या झरी झिरपतात आरपार.
मग सावलीत ते वारुळ
एखाद्या विदुषकाच्या टोपीसारखं दिसतं...
ती टोपी मी घालतो,
आरश्यात स्वतः ला बघतो,
खूप हसतो,
हसता हसता डोळ्यांच्या कडा भरुन
दुथडी भरून वाहू लागतात.
मग त्या पाण्यात ते वारुळ बुडून जातं,
पार विस्कटून, पसरून भुईसपाट होतं
आणि उरल्या सुरल्या मुंग्या तरंगू लागतात
कधीच्याच मेलेल्या.

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट