मुख्य सामग्रीवर वगळा
Search
हा ब्लॉग शोधा
शब्दमात्र
पेज
आणखी…
Home
Home
Home
शेअर करा
लिंक मिळवा
Facebook
X
Pinterest
ईमेल
अन्य अॅप्स
जानेवारी ०२, २०२१
विवस्त्र
वेळ सुटत चालली आहे
हातातून निसटून,
घरंगळत.
उतरत जात अंगावरून खाली,
क्षणागणिक, नग्न करत,
उमटवत पाऊलखुणा डोळ्यांखाली,
सैल सोडत कातडीच्या गाठी.
धरू पाहिलं तर हाती
आरस्पानी सावल्या
आणि आरश्यात अनोळखी जिवलग.
इतके विवस्त्र आपल्याच प्रतिबिंबात
कधीच नसतो आपण.
टिप्पण्या
लोकप्रिय पोस्ट
जानेवारी ०९, २०२३
अविरत
ऑक्टोबर २२, २०२३
रेशीमगाठी
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा