कोंब
ते आज दिसेनासं झालं आहे.
असं असलं तरी
थोडं-बहुत अजूनही शाबूत आहे...
आपण तेच आहोत
आपल्यातलं अंतरही तेवढंच आहे
येणाऱ्या - जाणाऱ्या श्वासांमधलं
जर थांबलेच हे श्वास तर दुरावा कायमचाच
आपल्यातलं अंतरही तेवढंच आहे
येणाऱ्या - जाणाऱ्या श्वासांमधलं
जर थांबलेच हे श्वास तर दुरावा कायमचाच
पण तोवर, निसटून जात कामा नये सारं,
मिट्ट धुक्यातून जाताना हात घट्ट धरून ठेव,
उचलून घेऊ सोबत ते सारं काही
जे तुटून, विखरून पडलं आहे आपलं
मिट्ट धुक्यातून जाताना हात घट्ट धरून ठेव,
उचलून घेऊ सोबत ते सारं काही
जे तुटून, विखरून पडलं आहे आपलं
असतोच आपल्याला जन्मजात निर्मितीचा विकार
शून्यातूनही सारं काही पुन्हा करू शकतो साकार
इवल्याश्या विश्वासाचं कोंब आहे माझ्याजवळ,
गरज आहे ती तुझ्या मातीची रुजवायला, सृजवायला
शून्यातूनही सारं काही पुन्हा करू शकतो साकार
इवल्याश्या विश्वासाचं कोंब आहे माझ्याजवळ,
गरज आहे ती तुझ्या मातीची रुजवायला, सृजवायला
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा