दिवेलागणीच्या वेळी
पक्षी परतुनी येती, बिंब भिजे पाण्याआड
दिवेलागणीच्या वेळी, मन कातर कातर
घर-वाटेशी लावून आस केव्हाची नजर
घर-वाटेशी लावून आस केव्हाची नजर
दिवेलागणीच्या वेळी, डोळे धूसर धूसर
पाणावल्या तळ्याकाठी आठवणींची आरास
पाणावल्या तळ्याकाठी आठवणींची आरास
दिवेलागणीच्या वेळी, करी वारा भणभण
ओल्या रातीची चाहूल, लावे मना कुणकुण
ओल्या रातीची चाहूल, लावे मना कुणकुण
दिवेलागणीच्या वेळी, माजे उरात काहूर
तुळशीच्यापाशी दिवा, करी मनाची राखण
तुळशीच्यापाशी दिवा, करी मनाची राखण
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा