इथवर
इतक्या दूरवर, जिथून हात उंचावून सहज
खुडून घेता येतील काही तारे स्वप्नातले
आणि हलकं वाकून ओंजळीत उचलून धरता येतील
शब्द, आपण दिलेले एकमेकांना..
आठवतं तुला?
जेव्हा सुरू केला आपण हा प्रवास,
तेव्हा हातभर लांब प्रश्न सरसरत जायचे पायाखालून,
कित्येक अपेक्षा रुतून बसायच्या बोजड मनात,
आणि धावलं कितीही तरी पडायची नाहीत
पावलं आपली एका लयीत, एका सुरात..
कोण जाणे माझी हाक कधी तुला ऐकू आली की नाही,
कारण मागे वळून पाहताना तुझ्या नजरेला
माझी ओळख तेव्हा पटलीच नव्हती कधी...
जेव्हा सुरू केला आपण हा प्रवास,
तेव्हा हातभर लांब प्रश्न सरसरत जायचे पायाखालून,
कित्येक अपेक्षा रुतून बसायच्या बोजड मनात,
आणि धावलं कितीही तरी पडायची नाहीत
पावलं आपली एका लयीत, एका सुरात..
कोण जाणे माझी हाक कधी तुला ऐकू आली की नाही,
कारण मागे वळून पाहताना तुझ्या नजरेला
माझी ओळख तेव्हा पटलीच नव्हती कधी...
आज इथे मात्र ह्या निरव शांततेत,
काहीतरी हळुवार धपापतय
आपल्याला जोडणाऱ्या व्यासातून,
खूप ओळखीची साद ऐकू येत आहे
तुझ्या प्रत्येक श्वासातून,
माझ्या हातात विणलेले तुझे हे हात
न जाणे कधीचे बनले आहेत माझेच जिवलग..
आणि आता अंगभर धावून येत आहेत शहारे
कौतुकाने पहायला हा मनाचा सोहळा.
काहीतरी हळुवार धपापतय
आपल्याला जोडणाऱ्या व्यासातून,
खूप ओळखीची साद ऐकू येत आहे
तुझ्या प्रत्येक श्वासातून,
माझ्या हातात विणलेले तुझे हे हात
न जाणे कधीचे बनले आहेत माझेच जिवलग..
आणि आता अंगभर धावून येत आहेत शहारे
कौतुकाने पहायला हा मनाचा सोहळा.
संपली नाही ही वाट इथे, हा फक्त विसावा
काही क्षणांचा, एकांताचा किनारा.
इथे बसून थोडा वेळ अदमास घेऊ क्षितिजाचा
आणि मग पसरत जाऊ आरस्पानी आकाशी
उमलवत निळ्या वाळूवर आपल्या चांद- खुणा,
उडत भणभणणऱ्या वाऱ्यासोबत,
पंख फुटतील तसे आणि तोवर..
काही क्षणांचा, एकांताचा किनारा.
इथे बसून थोडा वेळ अदमास घेऊ क्षितिजाचा
आणि मग पसरत जाऊ आरस्पानी आकाशी
उमलवत निळ्या वाळूवर आपल्या चांद- खुणा,
उडत भणभणणऱ्या वाऱ्यासोबत,
पंख फुटतील तसे आणि तोवर..
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा